**विद्यार्थ्यांना व पालकांना मन:पूर्वक आवाहन** **प्रवेशोत्सव 2025-26**
संस्था – जीवन विकास शिक्षण संस्था संचालित मधूकरराव चव्हाण विद्यालय, केमवाडी
शाळा कोड – 27290706202
शाळाबाह्य, शिक्षणापासून वंचित आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील बालकांना शाळेच्या प्रवाहात आणणे.
ग्रामीण, आदिवासी व तांडा वस्ती क्षेत्रांतील गोरगरीब, शेतमजूर व स्थलांतरित कुटुंबांमधील अनेक मुले शिक्षणापासून दूर होती. त्यांची शाळेत हजेरी खूपच कमी होती किंवा अनेक मुले शाळाबाह्य होती. ही समस्या लक्षात घेऊन मधूकरराव चव्हाण विद्यालय, केमवाडी येथील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन घरोघरी जाऊन, वस्तीवर भेट देऊन, पालकांशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला.
श्री. खुने आर. एन. – मुख्याध्यापक
श्री. गुरव डी. एम. – शिक्षक
श्री. रोकडे बी. एस. – शिक्षक
श्री. चव्हाण व्ही. आर. – शिक्षक
श्री. मोरे यु. व्ही. – शिक्षक
श्री. सुर्यवंशी एस. व्ही. – लिपिक
श्री. सुतार आर. डी. – सेवक
श्री. जाधव एस. एम. – सेवक
श्री. साळुंके एस. एस. – सेवक
श्री. मसुते जी. आर. – सेवक
✅ दररोज पहाटे ६ वाजता वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष पालकांशी संवाद
✅ शाळा सोडून गेलेल्या मुलांची यादी तयार करून त्यांच्यावर विशेष लक्ष
✅ शिक्षणाचे फायदे समजावणे – भविष्यातील संधी, व्यक्तिमत्त्व विकास
✅ पालकांच्या शंका आणि अडचणींवर संवाद व मार्गदर्शन
✅ मुलांच्या शैक्षणिक किट्सची आवश्यकता, पोषण आहाराची गरज जाणून घेणे
✅ विशेष प्रयत्न करून शाळाबाह्य 20+ मुले शाळेत दाखल केली
📌 20+ शाळाबाह्य व घरी बसलेली मुले पुन्हा शाळेच्या प्रवाहात
📌 पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
📌 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये 40 % वाढ
📌 स्थलांतरित कुटुंबांतील पालकांची जागृती
📌 विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व आत्मसन्मानात वाढ
"शिक्षण फक्त वर्गात घडत नाही — ते गावोगाव, वाड्यावस्त्यांवर घडते, जेव्हा शिक्षक स्वतः पुढाकार घेतात."
मधूकरराव चव्हाण विद्यालयाच्या शिक्षकांनी शिक्षणाच्या ज्योतीसाठी दिलेला हा वेळ, श्रम व समर्पण निश्चितच एक सामाजिक आदर्श ठरतो.
"मुख्याध्यापक म्हणून मी अनेक शैक्षणिक उपक्रम पाहिले, पण वस्तीवर जाऊन पालकांशी संवाद साधणे, हे अनुभव फारच वेगळं आहे. काही घरांत मुलं आजारी, तर काही ठिकाणी मुलं मजुरीसाठी पाठवली जात होती. आम्ही विश्वासाने बोललो आणि पालकांनी ऐकलं. आज तीच मुलं वर्गात हजर असताना पाहून समाधान वाटतं – शिक्षक म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून."